GuidePedia

  शिक्रापूर  (प्रतिनिधी  ) म्हसे  टाकळी,हाजी (ता शिरुर ) येथे यशस्वी नी वेल्फेअर फौडेशनच्या वतीने सुगंधी उटणे फेसपँकचे प्रशिक्षण देण्यात आले . या भागातील ४० बचत गटातील मुलीनी भाग घेतला होता .या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद भेटला  नुकतेच शिरुर येथे आदर्श माता पुरस्कार  मिळालेल्या या भागातील भामिनीताई शिंदे . यांचे विशेष मार्गदर्शन  लाभले.कार्यक्रमाचे स्वागतपर प्रस्ताविकामध्ये यशस्वीनीच्या सचिव नम्रताताई गवारे यानी सागितले की हे प्रशिक्षण घेण्यापाठिमागे महिलाचे उत्पादन बाजारात चांगला प्रकारे यावे त्यांना योग्य तो बाजारभाव भेटावा .यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे  .लवकरच येत असलेल्या दिवाळी सणासाठी बचत गटाच्या महिलाकडुनच उटणे घेण्याचे आवहान गवारे यांनी केले.तसेच धामारी येथील उद्योजिका रेखाताई केंजळे यांनी पेपर बँग कशाप्रकारे बनावयाच्या यांचे प्रशिक्षण  दिले.यावेळी रोहिणी वेताळ,पुष्पा पवार,दिपाली मुसळे,सविता शिंदे ,शोभा देवकर,उज्वला चौगुले  प्रतिक्षाशेलार मैना गव्हाणे,संगिता गुजाळ छाया मुसळे .आदीनी प्रशिक्षणामध्ये भाग घेतला

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top