GuidePedia

खेड(प्रतिनिधि)
 मा खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी नुकतीच राजगुरुनगर मधील काही पत्रकार मित्रांसोबत पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट कामाची पाहणी केली. सर्वांसाठी आनंदाची बाब म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान पुणे- नाशिक महामार्गावरील खेड घाटाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली

    ते म्हणाले की लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होण्याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ऑक्टोबर २०१८ मध्ये खास बाब म्हणून पुणे-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या खेड घाटासह पाच बाह्यवळण कामांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे ४५० कोटींची मंजुरी आणण्यात यश मिळविले. त्यांनतर प्रयत्नांची पराकाष्टा करीत खेड घाट व नारायणगाव बायपास या ८० कोटी रकमेच्या कामांची स्वतंत्र निविदा जलदगतीने करून घेतली. त्यामुळे या गर्दीच्या महामार्गाची कामे वेगाने सुरु करणे शक्य झाले. २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेल्या बाह्यवळण कामांपैकी खेड घाट व नारायणगाव बायपास या कामांची फेब्रुवारी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ८ मार्च २०१९ रोजी रोड वे सोल्युशन या कंपनीला ७२ कोटींना हे काम निश्चित होऊन कामाचे इरादा पत्र देण्यात आले. त्यानंतर लोकसभेची आचार संहिता जाहीर झाल्याने जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली. हे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आले असून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व कामाचा दर्जा चांगला असावा यासाठी अधिकारी व ठेकेदार यांच्याशी माझा सातत्याने संपर्क असतो. खेड घाटाच्या कामामध्ये तुकाईवाडी हद्दीतील झणझणस्थळ येथे सुमारे ३०० मीटर रस्त्यासह ८० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाची उभारणी अद्याप बाकी आहे. या पुलाची उंची ८ मीटर तर रुंदी ११ मीटर असणार आहे. पुलाखालून भुयारी मार्गाद्वारे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोय केलेली आहे. येथील कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी असून हे काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना ठेकेदारास दिलेल्या आहेत. त्यामुळे खेड घाटातील वाहतूक कोंडी कायमची दूर होऊन नागरिकांचा या महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीसाठी महत्वाच्या असणाऱ्या नारायणगाव बायपासचे कामही जलद गतीने सुरु असून हा महामार्ग नोव्हेंबर महिन्यात खुला करण्यात येईल.
पुणे-नाशिक महामार्गाच्या वाहतूक प्रश्नावर विरोधकांनी सातत्याने राजकारण केले. मी मात्र कसोशीने केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून आयएलएफएस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील वादात अडकलेला हा महामार्ग यशस्वीपणे पूर्ण करून येथील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान खूप मोठे आहे
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, रोड वे सोल्युशनचे व्यवस्थापक संतोष घोलप, तिन्हेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब सांडभोर, उपसरपंच शिवाजी सांडभोर, तुकाईवडीचे माजी उपसरपंच बाळकृष्ण थिगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top