GuidePedia

 बातमी विशेष वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी जोरदार तयारी सुरु झालेली आहे. येत्या ५ ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीती हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील, अशी माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळलेली आहे.
दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले गेले आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top