GuidePedia

(शिक्रापुर प्रतिनिधि)कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवार दि १९ जुलै रोजी आद्य संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करत शांततेत संपन्न केला तसेच सावता महाराज पुण्यतिथी निमीत्त श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष,श्री सचिनभाऊ गुलदगड,प्रदेशाध्यक्ष श्री जितेंद्रभाऊ महाजन,प्रदेश प्रवक्ता श्री अजिंक्यभैय्या फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. शासनाच्या नियमांचे पालन करत सॅनिटायझर वाटप करण्यात आले त्यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल महाराज गडगे,जिल्हा संपर्क प्रमुख रेवणनाथ गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भुजबळ,जिल्हा संघटक विकास खरपुडे,शिरुर तालुका अध्यक्ष अविनाश गायकवाड,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र ताठे हे सर्व पदाधिकारी,व ग्रामस्थ उपस्थित होते,सर्वांना शासनाचे नियम पाळण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आणी कोरोना महामारी मधे यानंतर देखील सॅनिटायझर व मास्क वाटप केले केले जाईल अशी माहीती सावतामाळी युवक संघाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख रेवणनाथ गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top