GuidePedia


बातमी विशेष वृत्तसंस्था  
शिवसेनेचे आमदार  प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांना उत्तर दिलं आहे. माजिद मेमन यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी न होण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देत आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. राज्यातील महविकास आघाडीचं सरकार केवळ भाजपच्या विरोधात एकत्र आलं आहे. त्यामुळे आपला अजेंडा सोडण्याचा विषयच येतं नाही. शिवसेनेचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. तो अजेंडा शिवसेना कधीही सोडणार नाही.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आलेले तिन्ही पक्ष हे भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. या तिन्ही पक्षांचा जो अजेंडा आहे तो वेगवेगळा आहे. यामध्ये शिवसेना आपला हिंदुत्वाचा अजेंडा कधीही सोडणार नाही. आमदार प्रताप सरनाईक यांनीच राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाल दास यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भूमिपुजन कार्यक्रमासाठी नियंत्रित करावे अशी मागणी केली होती. तसेच राम मंदिर निर्माण कार्यामध्ये शिवसेनेचं योगदान पाहता एका जुन्या रामभक्त शिवसैनिकाला राम मंदिर ट्रस्टवर नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
प्रताप सरनाईक यांनी भाजपवर राम मंदिराच्या नावावर राजकारण करण्याचा आरोप करत म्हटलं की, महत्त्वाची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भाजपकडून निमंत्रण येण्याबाबत, तर त्यांना मी आठवण करून देतो की, ज्यावेळी देशातील सर्व सिंह बिळात लपून बसले होते त्यावेळी शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या डरकाळीमुळे राम मंदिर कार्य मार्गी लागले. आणि आज ते होतं आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टने सन्मानाने मुख्यमंत्री उद्धार ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाच्या कामासाठी बोलवावं. राम मंदिर निर्माणासाठी एकाही नेत्याने एक रुपयाही दिला नव्हता, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम राम मंदिर ट्रस्टला देऊ केली आहे. राम मंदिरासाठी जे शिवसेनेने केलं आहे ते इतर कोणीही केलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सन्मानाने बोलावण्यात यावं.’

Post a Comment

  1. Baccarat Strategy & Tips - Worry Definition, History, Games
    In the U.S., 바카라 the majority of casinos allow players to play online roulette in a style that is 바카라 very similar to the traditional casino choegocasino game. The Roulette

    ReplyDelete

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top