GuidePedia

पुणे (प्रतिनिधि):-पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 13ते 23जुलै असा लाॅकडाउन जाहिर करण्यात आला आहे या काळात अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात आली
त्यानंतर या नियमात काही प्रमाणात शिथिलता करण्यात
 आली आहे आज लाॅकडाउन चा सातवा दिवस आहे  पण यापुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लाॅकडाउन असणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली 
           ते म्हणाले लाॅकडाउन हा पर्याय वापरुन कोरोना पुर्णपणे संपणार असे कोणत्याही अधिकारी यांचे मत नाही पण मध्यंतरी अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाजता होती
ही वाढ कोठेतरी नियंत्रणात आणणे आवश्यक होते   त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता पण या काळात आम्ही कोणतेही कंपनी उद्योगधंदे बंद केले नाही कोणत्याही व्यावसायिकाने प्रशासनाकडे तक्रार केली नाही  या लाॅकडाउन मध्ये नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले मात्र यापुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लाॅकडाउन असणार नाही पण नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन करणे बंधनचारक आहे तसेच गर्दी टाळण्यासाठी आम्ही काही अभिनव प्रयोग नक्कीच करणार आहे कंटेनमेंट झोन किंवा ज्या भागात रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहे तिथे देखील आवश्यक ते सर्व काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे 



     
                    

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top