GuidePedia

लेखक:- संदिप (विशाल)तांबे पाटील
आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्टयातील आंबेगाव , शिरूर आणि खेड या तीन तालुक्याच्या सरहद्दीवर डोंगरावर जेमतेम ४०० ते ५०० लोकसंख्या असलेले शिरदाळे हे माझ छोटस गाव. पाण्याच कोणतही साधन नसल्यामुळे जिरायती शेती ही आमच्या गावची खरी ओळख. परंतु , आमच्या गावाला दोन प्रमुख गोष्टींनी एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला असे मला वाटते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे गावच्या बाजूला असणारे तळे, ज्यामध्ये बारामाही असणारे पाणी , ते रस्त्यावरुन येताजाता सहज आपल्या द्रूष्टीस पडते. लोकांमध्ये कायम हा कुतुहालाचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे की  इतक्या उंचीवरती डोंगर परिसर असून देखील इथे पाणी कसे काय राहते, आजूबाजूच्या परिसरात जरी दुष्काळ असला तरी इथे मात्र कधीही दुष्काळाची छाया जाणवत नाही.
आणि दुसरी प्रमुख गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले धामणी येथील खंडोबाचे मूळस्थान हे शिरदाळे येथील सागदऱ्यात आढळून येते. येथील संपूर्ण परिसर हा सागांच्या झाडांनी पूर्णपणे वेढलेला आहे, त्यामुळे त्याला सागदरा संबोधले जाते. येथील खंडोबा देवस्थान तसेच तांबे भक्त निमगाव दावडी येथून धामणी पर्यंत देवाचे परिक्रमण याबाबत अनेक सुरस कहाण्या आज सांगितले जातात. आजपर्यंत हा परिसार खूप खोल आणि अडचणीचा असल्यामुळें लोकांची जाण्यायेण्याची खूप मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन समस्थ ग्रामस्थ शिरदाळे यांच्या पुढाकारानेआणि सहकार्याने देवाचा चौथारा, पायऱ्या याच काम अगदी लिलया पार पडले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान दिले  ते शालेय शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलांनी कारण हा परिसर खूप खोल आणि अडचणीचा असल्यामुळें येथे मटेरियल नेण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था नव्हती त्यामध्ये  खासकरून महिला भगिनी आणि शाळकरी मुलांनी खूप अस मोलाचे योगदान दिले. लाँकडाऊनच्या काळात पुणे ,मुंबई परिसरातील बरेचशे लोक गावाकडे आल्यानंतर त्यांचा येथे जाण्याचा कल वाढला आहे. कामाबाबत सर्वच लोक समाधान व्यक्त करत आहेत.येथील निसर्ग रम्य परिसर आपल मन नक्कीच आकर्षित करतो. येथे आल्यानंतर आपण क्षणभर जरी थांबलो तरी एक वेगळ आत्मिक समाधान नक्कीच मिळते. निसर्गाची अगदी जवळून ओळख होण्यास मदत होते. त्यामुळे मला वाटते आपण सर्वांनी या ठिकाणाला एकदा तरी नक्कीच भेट द्या  

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top