GuidePedia


जुन्नर (प्रतिनिधि):-
       संत सावतामाळी महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या जुन्नर तालुक्याच्या वतीने श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड, महिला प्रदेशाध्यक्षा अनुराधा गडगे, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सावता महाराज जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच आळेफाटा येथे पार पडला.*
 श्री संत सावतामाळी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.  नंतर  आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर यांना कोरोना संकट काळातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल श्री संत सावता महाराज कार्यगौरव तर  सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ शिंदे (भावकी) यांना सामाजिक   योगदानाबद्दल संत सावता महाराज जीवनगौरव पुरस्कार फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करीत मोजक्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल महाराज गडगे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी   जुन्नर तालुका अध्यक्ष संजय शिंदे, महिला तालुकाध्यक्षा अर्चना विधाटे, विशाल भुजबळ, गणपतशेठ गडगे, मारुती विधाटे यांनी परिश्रम घेतले.*पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा #बेरोजगार #युवक-#युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी. मेळावा दि. 20 #ऑक

 
Top